** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, April 22, 2021

जिल्ह्यात 7 लाख 58 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 58 हजार 756 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 39 हजार 466 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 18 हजार 985 जणांनी दुसरा डोस घेतला.  44 हजार 797 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 14 हजार 367 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 16 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस तर 12 हजार 171 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 58 हजार 202 नागरिकांनी पहिला डोस तर 29 हजार 841 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 58 हजार 756 जणांनी पहिला डोस तर 73 हजार 364 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.