** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 1, 2021

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 


           

            कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) :  : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने घोषित केले होते. तथापी या कार्यक्रमास दि. 5 डिसेंबर 2021 अखेर मुदतवाढ दिली असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी  दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत, असे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) शरद दळवी यांनी कळविले आहे.

            दावे व हरकती निकालात काढणे दि. 20 डिसेंबर पर्यंत तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

 00 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.