** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 7, 2021

शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेशासाठी अर्ज करावेत


 

          कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गामधील ८ वी, ११वी व प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सन २०२१-२२ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृह अधिक्षकांशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावेत व आवश्यक कागदपत्रासह परीपूर्ण प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षकांकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे,

वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी प्रकारच्या सोयी  विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ याव्दारे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.

000000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.