** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 22, 2021

‘स्टँड अप इंडिया’ योजनेच्या लाभासाठी अर्ज करा

 


कोल्हापूर, दि. 22 (जिमाका):  ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देईल. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी संपर्क साधावा.

केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया या योजनेचा लाभ घेवून प्रकल्पाची उभारणी केलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील उद्योजकांना राज्य शासन 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल, असे पत्रकात नमुद केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.