कोल्हापूर दि. 6 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहाकरिता तात्पुरत्या स्वरुपात
कंत्राटी पध्दतीने अशासकीय अधिक्षक पद भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि.
10 डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अशासकीय
अधिक्षक हे पद कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक
आर्मीमध्ये जेसीओ पदावर काम केलेला असावा.
इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर
दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.