** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 9, 2021

16 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभागाच्यावतीने  दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर येथे डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.  विशेषत: टपाल, वस्तुमनीऑर्डर/ बचत खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  उदा तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव हुद्दा इत्यादी संबंधितानी डाक सेवे बाबतची तक्रार  प्रवर अधीक्षक डाकघर रुपेश सोनावले, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६००३ यांचे नावे दोन प्रती सह दिनांक १३  डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

 00 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.