** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 1, 2021

सोमवारी लोकशाही दिन

 

कोल्हापूर, दि. 01 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली.

सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा. शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासनपरिपत्रकान्वये अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांना अर्ज करावयाचा झाल्यास तालुका लोकशाही दिनामध्ये केलेल्या अर्जाचे उत्तर व टोकन नंबर जोडूनच अर्ज करावेत. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनापुर्वी करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपले तक्रार अर्ज देण्यात यावेत, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.