** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 7, 2021

जिल्हा मराठी भाषा समिती गठीत

 


          कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व मराठी भाषा न वापरण्या संदर्भात तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा मराठी भाषा समिती गठीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.

           या समितीची रचना अशी आहे. नाव, पदनाम, समितीतील पद- श्री. राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर अध्यक्ष, डॉ. कादंबरी बलकवडे, - महानगरपालिका आयुक्त,  सदस्य, श्री. शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक सदस्य, श्री. संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य, श्री. एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (माध्य.), सदस्य, श्री. युवराज कदम, साहित्य संस्था, सदस्य, श्री. अमेय जोशी, प्रकाशन संस्था, सदस्य, श्रीमती अपर्णा वाईकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सदस्य सचिव याप्रमाणे राहील.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.