कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : कोल्हापूर
पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडूरंग डोंगळे यांच्या
सौजन्याने व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा यांच्या सहकार्याने कारागृहाचे
अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाने विविध रोगावरील आरोग्य तपासणी शिबीराचे
आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर
यांच्या तर्फे सी.पी.आर ब्लड बँक, ओम हॉस्पीटल कोल्हापूर यांनी या शिबीरामध्ये सहभाग
घेतला. यामध्ये रक्तदान, नेत्ररोग, कान, नाक, घसा व सर्वसाधारण तपासणी करण्यात आली.
शिबीरामध्ये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय
व नातेवाईकांची मोफत तपासणी करण्यात आली.
सुधारणा व पुनर्वसन शिक्षण घेतलेले शिक्षा बंदी विनायक जाधव व योगेश
इंगळे यांनी सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान
करुन कारागृहाची सामाजिक बांधिलकी जपली.
00000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.