कोल्हापूर दि. 01 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित
असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय
पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छूकांनी आपले अर्ज दि. 7 डिसेंबर पर्यंत जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी
केले आहे.
अशासकीय पहारेकरी हे पद कंत्राटी पध्दतीने व एकत्रित
मानधनावर आहे. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच इतर अटी, शर्ती
व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्र.
0231-2665812 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.