** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, April 4, 2020

जिल्ह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 परराज्यातील 496 - जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का) :-  जिल्ह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 आणि परराज्यातील 496 अशा एकूण 699 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 21 परराज्यातील 5 अशा 26 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 16 परराज्यातील 8 अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.       करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील 8 एकूण क्षमता 50 जणांची आहे. कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील 3 परराज्यातील 97 एकूण 100 जण असून  क्षमता 113  जणांची आहे.  जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 3 परराज्यातील 44 असे एकूण 47 जण असून क्षमता 50 जणांची आहे.
            हातकणंगले-घुगरे सर यांचे  निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 77 जण असून क्षमता 100 जणांची आहे.  अशोकराव माने ग्रुप  वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 107 असे एकूण 109 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 43  परराज्यातील 8 एकूण 51 जण असून क्षमता 55 जणांची आहे.  राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील 64 जण असून क्षमता 70 जणांची आहे.
        शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17  असे एकूण 30 क्षमता 25 आहे.
        गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 10 परराज्यातील 1 एकूण 11 असून क्षमता 24 जणांची आहे,
            गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील 13  जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.
            यामध्ये तामिळनाडूमधील 195, कर्नाटकातील 191, राजस्थानमधील 62, उत्तरप्रदेश मधील 29, मध्यप्रदेशमधील 10, पाँडेचरी मधील 2, पश्चिम बंगालमधील 1, केरळमधील 5, बिहार 1 अशा एकूण 9 राज्यातील 496 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 203 असे मिळून 699 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.