** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 6, 2020

कसबा बावड्यातील मराठा कॉलनी सिलबंद



       कोल्हापूर, दि. ६ (जि.मा.का) :-  कसबा बावडा येथील मराठा कॉलनी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले.
       सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्याने होतो. महानगरपालिका हद्दीमध्ये मराठा कॉलनी, कसबा बावडा येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.
            भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार मराठा कॉलनी प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्राच्या सीमा व त्यामधील क्षेत्र तसेच मराठा कॉलनीमध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात आल्या आहेत.
0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.