** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 24, 2020

जिल्ह्यात 9 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1 हजार 23 जणांची सोय





       कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का) :-  जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 23 जण घेत आहेत.
           करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी - पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.