** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, April 22, 2020

रमजान महिन्यात 60 लाखाची मदत देणाऱ्या मुस्लिम समाजाची नोंद घ्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र



       कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का) :  इचलकरंजी येथील मुस्लिम समाजाने आयजीएम रुग्‍णालयाला 30 लाख तसेच कोल्हापूरच्या बैतुल माल कमिटीने सीपीआरला 30 लाख रुपये आयसीयु युनिटला देवून मोठा आदर्श निर्माण केला आहे. संकटकाळी मुस्लिम बांधवांनी दिलेल्या योगदानाची नोंद शासन दरबारी घ्यावी, अशी विनंती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.    
       मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, राज्यात व देशात तसेच संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूशी लढताना राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने राज्य शासनाच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाज धावून आला आहे. येवू घातलेला रमजान महिना उत्साहाने साजरा करण्याऐवजी अत्यंत साधेपणाने साजरा करु. त्यातील बचत झालेल्या रक्कमेतून महाराष्ट्र शासनाच्या जिल्ह्यातील इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाला इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने 30 लाख रुपये रक्कम तर कोल्हापूर येथील बैतुल माल कमिटीने सीपीआर रुग्णालयाला 30 लाख रुपये आयसीयू युनिटला देवून मोठा आदर्श निर्माण केला आहे.
          कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील मुस्लिम बांधवांना संकटकाळी दिलेल्या योगदानाची नोंद शासन दरबारी व्हावी.
0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.