कोल्हापूर, दि. 3 (जिमाका)- कोरोना साथीच्या काळात विविध
वैद्यकीय उपकरण मागवणे असेल अथवा अन्य तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी एअर अँबुलन्स
आणि आवश्यक त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कोणत्याही आपत्कालीन उड्डानासाठी विमानतळ
सज्ज असेल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी आज दिली.
कोरोना विषाणू
प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी प्रवाशी तसेच अन्य माल वाहतूक सेवा बंद
असल्याचे सांगून श्री कटारिया म्हणाले, मेडिकल इमर्जन्सीची सूचना मिळल्यास अवघ्या
दोन तासात एअर अँबुलन्स, आपत्कालीन सेवा, परवानगी, मालवाहू सेवा, वैद्यकीय
सुविधेसह आणि आवश्यक त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विमानतळ सज्ज असेल. तेही सामाजिक
अंतर ठेवत या सुविधा दिल्या जातील.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून
नियमित निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता सुरु आहे. विमानतळावर सेवा देणाऱ्या
कर्मचाऱ्यांना अन्न तसेच शिधा पुरवठा करण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उडान करण्यास विमानतळ सज्ज
आसल्याचेही श्री. कटारिया यांनी सांगितले.
0000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.