कोल्हापूर,
दि. 4 (जि.मा.का) : येथील सीपीआर रुग्णालय सध्या कोरोना संशयित आणि कोरोना बाधित
रुग्णांसाठी संपूर्णपणे राखीव ठेवले आहे. या रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर
व्याधी व आजाराने त्रस्त असलेले रुग्ण येतात. कोरोना संशयित अथवा बाधित रुग्णांना
प्राधान्य द्या. परंतु, इतर जे रुग्ण येत आहेत त्यांचीही नेहमीप्रमाणे काळजी घ्या,
अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज केली.
सार्वजनिक
आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी आज सीपीआर आणि सेवा रुग्णालयाला भेट
देवून आढावा घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. बी सी केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अधीक्षक डॉ. उमेश
कदम आदी उपस्थित होते.
आरोग्य
विभागाने कोरोना व्यतिरिक्त इतर येणाऱ्या रुग्णांसाठी शहरामध्ये अन्यत्र व्यवस्था केली आहे. याचा
आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, सीपीआर
हॉस्पिटल पूर्वीपासून सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी एक आधारवडासारखे काम करीत आले
आहे. त्यामुळे जिल्ह्यांमधून ज्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार परवडत नाहीत,
असे अनेक रुग्ण सीपीआरमध्ये दाखल होत असतात. यामध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला,
अपघात विभागांकडे येणारे रुग्ण, सर्पदंश आणि बरेचसे असे आजार आहेत, ज्यांच्यावर
तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. आरोग्य विभागाने अशा सर्व रुग्णांसाठी शहरात ठीक
ठिकाणी वेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे.
बाहेरून
आलेला रुग्ण त्याला याची माहिती नसते. त्यामुळे सीपीआरमध्ये एक माहिती कक्ष सुरू
करावा आणि अशा येणाऱ्या रुग्णांना नेमके त्याने कोठे जायचे याबाबतचे मार्गदर्शन व
मदत करावी. अशा सूचना त्यांनी दिल्या.
0000



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.