** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 6, 2020

अवैद्य मद्य विक्रीबाबत जिल्ह्यातील चार अनुज्ञाप्ती निलंबित




       कोल्हापूर, दि. ६ (जि.मा.का) :-  लॉकडाऊन कालावधीत अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या  जिल्ह्यातील चार अनुज्ञाप्तीधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांची अनुज्ञाप्ती निलंबित करण्यात आली आहे. तसेच या अनुज्ञाप्त्यांवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
       कोरोना पार्श्वभुमीवर लॉकडाऊन कालावधीत सर्व प्रकारची मद्य विक्री अनुज्ञापत्या बंद आहेत. मात्र अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील हॉटेल गुरुकृपा, एफएल-3, क्रमांक 36, कुरुंदवाड, ता. शिरोळ. हॉटेल ग्रीनलँड, एफएल-3, क्रमांक 330, मार्केटयार्ड रोड, कोल्हापूर. सीएल- 3, क्र. 10, गंगावेश कोल्हापूर आणि सीएल-3, क्र. 287 शिरोळ, ता. शिरोळ या चार अनुज्ञाप्त्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे.
            लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. या कालावधीत अवैद्य दारु विक्री होवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत अवैद्य, बनावट हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यात येत असून अवैद्य विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचे अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.         
00000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.