कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का) : दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत 15 हजार 695
दिव्यांगांना अलिम्को या केंद्र शासनाच्या कंपनीकडून 33 हजार दिव्यांगसाहित्य
मंजूर झाले असून संचारबंदीनंतर या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी दिली.
कोव्हिड-19 च्या साथीमुळे संपूर्ण
भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे इतर तालुक्यातील साहित्य वाटप करता आलेले नाही.
संचारबंदी समाप्त होताच सर्व पात्र दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात येणार
आहे. कोणताही पात्र दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही, असे जिल्हा परिषदेचे
जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.