** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 5, 2021

रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सीचे पासिंग 31 जुलै पर्यंत करता येणार - डॉ. स्टिव्हन अल्वारिस

 


 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी वाहनांना दि. 31 जुलै 2021 पर्यंत पासिंग करून घेता येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

 रिक्षा वयोमान 20 वर्षे ते 15 वर्षे व काळी-पिवळी टॅक्सी वयोमान 22 ते 16 वर्षे. कोल्हापूर विमान तळापासून प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत विमान पतन प्राधिकरणाने केलेल्या निवडीस अनुसरून ताज इंडिया टुर्स यांना मान्यता देण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या मुदतीत रिक्षा व टॅक्सी वाहनधारकांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा व आपली वाहने मुदतीत स्क्रॅप करावीत. नवीन परवान्यांचा मोठ्या संख्येने लाभ घेवून आपले परवाने वैध करून घ्यावेत, असे आवाहनही श्री. अल्वारिस यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.