** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 6, 2021

शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी सहयोग व विशेष उपक्रम केंद्रांतर्गत रामेती, कोल्हापूर या संस्थेस अभ्यासकेंद्र चालविण्यास मान्यता दिली आहे. सहा महिने (आठवड्यातून एकदा) कालावधीचा शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम रामेती येथे दि. 1 फेब्रुवारी 2021  ते जून 2021 या कालावधीत सुरू होत असून इच्छुक उमेदवारांनी दि. 31 जानेवारी पूर्वी http://ycmou.digitaluniversity.ac  www.ycmou.ac.in या लिंकव्दारे नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.