** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, January 22, 2021

सलग दुसऱ्या शुक्रवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय इमारतीत श्रमदान

 





 

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आज सलग दुसऱ्या शुक्रवारी अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेनंतर सुमारे एक तास स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागांचे जवळपास 20 कार्यालये आहेत. या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे परिसरात विविध प्रकारचा कचरा सर्वत्र पसरलेला असतो. वरिष्ठ भू वैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी हा कचरा स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून इमारतीमधील सर्व कार्यालयीन प्रमुखांशी संपर्क साधून स्वच्छता मोहीम राबविण्याचा विचार मांडला होता.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देण्याच्या कार्यक्रमाबरोबरच दर शुक्रवारी सायं. 5.30 नंतर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी केवळ 5 मिनीटे देण्याचे ठरले होते. त्याची सुरूवात गेल्या शुक्रवार पासून करण्यात आली होती. अवघ्या 5 मिनीटे म्हणता म्हणता एक तासात कचऱ्याचे ढिगारे परिसरात गोळा झाले होते. आजच्या सलग दुसऱ्या शुक्रवारी सुमारे एक तासभर विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदान केले.  

 या मोहिमेत स्वच्छतादूत अमित देशपांडे, शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांच्यासह भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय, मुद्रांक कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, विशेष लेखा परिक्षक, जिल्हा प्राधिकरण, उपसंचालक आरोग्य कार्यालय आदी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.