** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, January 4, 2021

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी सुट्टी जाहीर

 


 

कोल्हापूर, दि. 4  (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्ह्यातील ग्रामपंचायत या निवडणूक होऊ घातलेल्या गावातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना कामगारांना भरपगारी मतदानांच्या दिवशी शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी सुटी जाहीर केली आहे.

       निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत. अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने अशा मतदारांना शुक्रवार दि. 15 जानेवारी या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी/विशेष सवलत देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.