** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 5, 2021

मुक्त विद्यालय मंडळामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्र.विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

गुरूवार 31 जानेवारी रोजी रात्री 11.59 वा. पर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरणे. मंगळवार दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे. शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी  रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे.

 नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. 5 वी व इ. 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ae.in या संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.