** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 20, 2021

अनु. जमातीच्या लाभार्थ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

 


कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 मध्ये जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.

    जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना असून यासाठी 63 हजार 796 रूपये अनुदान देय आहे.

जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गट वाटप करणे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना असून यासाठी 53 हजार 429 रूपये अनुदान देय आहे.

जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत कार्यक्रमांतर्गत अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना 1 लाख 68 हजार 750 रूपये अनुदान देय आहे.

वरील सर्व योजनांचे अर्ज नमुना पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. गरजू लाभार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक 10 फेब्रुवारीपर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.