** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 13, 2021

राधानगरी येथे 6 वे धान खरेदी केंद्र सुरू

 


कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम 2020-21 अंतर्गत राधानगरी येथे 6 वे धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून राधानगरी ता. सह. खरेदी विक्री संस्था यांच्यामार्फत ही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती श्री. शाहू मार्केट यार्डातील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.

खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांचा मूळ डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा प्रत, या सातबाऱ्यावर चालू खरीप हंगाम 2020 मधील धान पीक लागवडीची नोंद असणे आवश्यक असून सोबत 8 अ उतारा, आधारकार्ड व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सची आवश्यकता आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार नोंद झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हमी भावाने खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल.

 माहितीकरिता वरील संस्थेच्या कार्यालयांशी अथवा श्री. शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.