** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 13, 2021

मलकापूर व गगनबावडा तालुका शिबीर कार्यालय तारखेत बदल

 


कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : मलकापूर व गगनबावडा तालुक्यांमधील शिबीर कार्यालयासाठी (कॅम्प) प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे या कॅम्पच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

 मलकापूर तालुका- 18 व 28 जानेवारी व गगनबावडा तालुका- 22 जानेवारी याप्रमाणे बदलून दिलेल्या तारखेस कार्यालयातर्फे शिबीर कार्यालय घेण्यात येईल याची मलकापूर व गगनबावडा तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.