** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 12, 2021

मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी


कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शिरोळ व हातकणंगले तालुक्यात  15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी  सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती आहेत. अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरूध्द आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्रीमती भोईटे यांनी कळविले आहे.

00000

      

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.