** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 20, 2020

राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिलला



       कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : माहे एप्रिल मध्ये होणारी राष्ट्रीय लोकअदालत  आता 11 एप्रिल ऐवजी शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली.
           या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांना कळविण्यात येते की, त्यांना आपल्या प्रिलिटीगेशनच्या केसेस ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य  कागदपत्रासह दिनांक 15 एप्रिल पर्यंत सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.