** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, March 18, 2020

जिल्ह्यात परदेश प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन






       कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या तसेच परदेश प्रवास करून काही लोक आले आहेत, येत आहेत, येणार आहेत याबरोबरच मुंबई, पुणे व राज्याच्या अन्य काही भागातून लोक स्वत:च्या मूळ गावी येत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या तपासणीची सोय छत्रपपती प्रमिलाराजे रूग्णालयात केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जिल्ह्यात येणाऱ्या अशा व्यक्तींनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. ज्यांना होम कोरोन्टाईन सल्ला दिला आहे त्यांनी आपल्या घरामध्येच सुरक्षित रहावे, जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होणार नाही.
          परदेशाहून व जिल्ह्यात आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 दिवस स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घ्यावे. बाहेरील व्यक्ती संपर्क टाळावा जेणेकरून आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्ती, समाज व कोल्हापूर जिल्हा कोरोना या विषाणू पासून सुरक्षित ठेवता येईल. यासाठी अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.  देसाई यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.