कोल्हापूर,
दि. 31 (जिमाका)- हातकणंगले येथील 37
वर्षाच्या तरुणाचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त
असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
येथील
सी. पी. आर हॉस्पीटल मध्ये 31 मार्च रोजी पहाटे 2.30 वाजता या तरुणास उपचारासाठी
दाखल करण्यात आले होते. त्यास श्वसनाचा गंभीर त्रास, तसेच निमोनिया व सेपसिस निष्पण
झाला. त्यांचा बाधित देशात, शहरात प्रवास
झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास
नव्हता. तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा स्वॅब
नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त
आहे.
हा
रुग्ण गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी 11-30 वा त्याचा
मृत्यू झाला.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.