** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, March 16, 2020

विरेंद्रसिंह यादव यांचा मृत्यू जुन्या फुफुसाच्या विकारामुळे



       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका):  विरेंद्रसिंह यादव (वय 68, रा. नागाव फाटा) यांचा मृत्यू जुन्या फुफूसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज दिली.
          त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, मृत यादव हे रविवार दि. 15 मार्च रोजी पहाटे 4 वा. ते श्वसनाचा त्रास असल्यामुळे गंभीर अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल झाले होते. दि. 8 मार्च ते 12  मार्च या कालावधित हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर असा प्रवास केला होता. या रुग्णास पूर्वीपासून असलेल्या जुन्या फुफुसाच्या आजाराचा  कोल्हापुरात आल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल झाले होते.
          या रुग्णाचा प्रवास हा हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणचा असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेवून पुणे येथील एन आय व्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सीपीआरमध्ये व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान रविवारी १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वा त्यांचा मृत्यू झाला.
          मृत विरेंद्रसिंह यादव हे कोरोना संशयित रुग्ण या व्याखेत बसत नसल्यामुळे त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असे पुण्यातील एन आय व्ही संस्थेने कळविले आहे. त्यामुळे  तो संशयित कोरोना रुग्ण नाही. त्यांचा मृत्यू जुन्या फुफुसाच्या विकारामुळे झाला आहे.
00000





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.