** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 3, 2020

43 वी डाक अदालत गोव्यात



कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजीव्दारे दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. पोस्ट मास्तर जनरल गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 43 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक सेवाचे सहायक निदेशक राजेश आणि सचिव, डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दिनांक 5 मार्च अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.