** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 3, 2020

शिंगणापूर-चिखली रस्ता तीन महिने वाहतुकीसाठी बंद



कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : करवीर तालुक्यातील राज्य मार्ग क्र. 194 वरील कि.मी. 14/750 येथे शिंगणापूर के.टी. वेअर जवळ पाईल राफ्ट पायावर आधारित बॉक्स रिटर्न वॉल बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती उप अभियंता धनंजय भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामामध्ये रस्त्याचे वारंवार वाहून जाणारे लांबीचे पूर्णपणे खोदाई करून काम करावे लागणार आहे. या कामासाठी 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे काम करताना एका बाजूस खाजगी शेती असून शेतीमध्ये ऊसाचे पीक व दुसऱ्या बाजूस नदी आहे, त्यामुळे काम करताना या रस्त्यावरील शिंगणापूर ते चिखली मार्गे जाणारी सर्व प्रकारची लहान-मोठ्या वाहनांची वाहतुक बंद करावी लागणार आहे. या रस्त्याने जोडणाऱ्या गावांना पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, असेही श्री. भोसले यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.