** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, November 25, 2021

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यास इच्छुक लाभधारकांनी प्रस्ताव सादर करावेत

 


 

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खासगी शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यास इच्छुक लाभधारकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पन्हाळा सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल तु.र. गायकवाड यांनी केले आहे.

 सामाजिक वनिकरण विभागामार्फत म.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत खासगी शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडीचे काम घेण्याकरिता खासगी लाभधारक बांधावर वृक्ष लागवड अंतर्गत दारिद्रय रेषेखालील, अल्पभूधारक, लहान शेतकरी, 1 हेक्टर क्षेत्राच्या आतील शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीकरिता अनुदान मिळते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठकीमध्ये प्रत्येक गावामध्ये म.ग्रा.रो.ह.योजनेंतर्गत कामे घेण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. या योजनेंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये त्यांची नावे, 7/12 उतारा, 8 अ उताऱ्यासह प्रस्ताव या सामाजिक वनिकरण कार्यालयास सादर करावेत.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.