** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 1, 2021

जिल्हा नियोजन समितीची सभा

 

 


          कोल्हापूर, दि. 1 (जिमाका)  : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वा. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी दिली.

       या बैठकीत दि. 23 जानेवारी 2021 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च 2021 अखेरच्या खर्चास व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22 कोविड -19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आढवा घेणे  व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.