** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 22, 2021

शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट शेडनेटगृहासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी

 


 

कोल्हापूर दि. 22 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर हरितगृह व शेडनेट गृहाचा लाभ दिला जातो. त्यासाठी महाडीबीटी या आपले सरकार पोर्टलवरील  mahadbtmahait.gov.in  या लिंकव्दारे लाभार्थ्यांनी मागणी करावयाची आहे. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट प्रकारच्या शेडनेटगृहाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

याअंतर्गत नव्याने केबल ॲण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृहाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.