** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 12, 2021

राष्ट्रीय लोकअदालत 11 डिसेंबरला

 


कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : राष्ट्रीय लोकअदालतीचे दि. 11 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली.

           या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी  व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांना कळविण्यात येते की, त्यांना आपल्या प्रिलिटीगेशनच्या केसेस ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य  कागदपत्रासह दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.