** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, November 9, 2021

संसाधन व्यक्तींच्या नामिकासुचीसाठी अर्ज करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 9  ( जिमाका ) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना प्रकरणे तयार करताना सहाय्य करण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करण्यात येणार आहे. यासाठी किमान अनुभव असणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी दि. 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयातील पदवी किंवा पदविकाधारक व अनुभव असलेल्यांना प्रथम प्राधान्य तर अनुभव नसलेल्यांना द्वितीय प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषि शास्त्रामध्ये पदवी असून अन्नप्रक्रियेचे डीपीआर बनविण्यासंदर्भात अनुभव असणाऱ्याला तृतीय प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेची सविस्तर मार्गदर्शक सूचना, अनुषंगिक माहिती www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज जिल्हा कृषि अधिकारी, कोल्हापूर कार्यालयात बंद लिफाफ्यातून सादर करावेत. 

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.