** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 12, 2021

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना

 


कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभाग व दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना कार्यान्वीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप, नि:शुल्क कोचिंग या योजना कार्यान्वीत आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या तीनही शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल माध्यमातून कार्यान्वीत करण्यात येत आहेत तसेच शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांना DBT मार्फत PFMS  प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेअतंर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी  www.scholarship.gov.in  या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत सादर करावेत असे, आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.   

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.