कोल्हापूर, दि. 3 (जिमाका)- जिल्ह्यात रक्ताचा पुरेसा साठा असून रक्ताचा तुटवडा नसल्याची
माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. मात्र ज्या रक्तदात्यांना
रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत सुरु केलेल्या http://www.kolhapurcollector.com/blooddonation/
या लिंक ऑनलाईन नाव नोंदणी करावी.*
जिल्ह्यात 250 लोकांनी आतापर्यात ऑन
लाईन रक्तदानाबाबत नोंदणी केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई
म्हणाले, प्रशासनाच्या ऑनलाईन रक्तदान नोंदणीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त
लोकांनी आपल्या नावाची नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे. या नोंदणीद्वारे
जिल्हास्तरावर एकत्रित डाटाबेस तयार करुन ज्यावेळी रक्ताची गरज भासेल त्यावेळी
संबधित रक्तदात्यास बोलाविले जाईल.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव,
सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगर पालिका यांच्या संयुक्त
विद्यमाने http://www.kolhapurcollector.com/blooddonation/ हे
संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अधिकाधिक दात्यांनी नोंदणी
करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ
कलशेट्टी यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.