कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 679 प्राप्त
अहवालापैकी 580 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 26 आहेत (9 अहवाल नाकारण्यात आले तर 64
नमुने अहवाल पुन्हा सादर). ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 66 प्राप्त अहवालापैकी 64
निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 2 आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 100 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 90 तर 10 पॉझीटिव्ह असे एकूण 38 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 48 हजार 373 पॉझीटिव्हपैकी 45 हजार 962 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 760 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 38 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-1,
गडहिंग्लज-4, हातकणंगले-2, कागल-2, राधानगरी-2, शाहूवाडी-1, शिरोळ-2, नगरपरिषद
क्षेत्र-4, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 व इतर शहरे व राज्य 3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा-847, भुदरगड- 1208, चंदगड- 1187, गडहिंग्लज- 1416, गगनबावडा-
143, हातकणंगले-5248, कागल-1648, करवीर-5554, पन्हाळा- 1838, राधानगरी-1216,
शाहूवाडी-1326, शिरोळ- 2473, नगरपरिषद क्षेत्र-7364, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-
14 हजार 660 असे एकूण 46 हजार 128 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 245
असे मिळून एकूण 48 हजार 373 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील 48 हजार 373 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 45 हजार 962 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 651 जणांचा
मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात 760 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.