कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यात आज दिवसभरात 201 रुग्ण
कोरोनामुक्त झाले. आजअखेर 48 हजार 335 पॉझीटिव्ह रुग्णांपैकी 45 हजार 902 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात 785 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 744 प्राप्त अहवालापैकी 628 निगेटिव्ह तर
पॉझीटिव्ह 53 आहेत (4 अहवाल नाकारण्यात आले तर 59 नमुने अहवाल पुन्हा सादर).
ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 80 प्राप्त अहवालापैकी 77 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 3
आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 166 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 159 तर 7
पॉझीटिव्ह असे एकूण 63 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 63 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1,
चंदगड-9, गडहिंग्लज- 4, हातकणंगले-7, करवीर-4, पन्हाळा- 1, शिरोळ-7, नगरपरिषद क्षेत्र-6, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 10 व इतर शहरे व राज्य 14 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची
संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-847, भुदरगड- 1208, चंदगड- 1186, गडहिंग्लज- 1412,
गगनबावडा- 143, हातकणंगले-5246, कागल-1642, करवीर-5554, पन्हाळा- 1838,
राधानगरी-1214, शाहूवाडी-1325, शिरोळ- 2471, नगरपरिषद क्षेत्र-7360, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 14 हजार 647 असे एकूण 46 हजार 93 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 242 असे मिळून एकूण 48 हजार 335 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील 48 हजार 335 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 45 हजार 902
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 648 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर
जिल्ह्यात 785 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.