कोल्हापूर दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्यातील
फलोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी अपेडाने विकसीत
केलेल्या फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपव्दारे करावी. जास्तीत-जास्त कृषी उत्पादीत
मालाची निर्यात करावी. काही अडचणी आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा नोंदणी
अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव
वाकुरे यांनी केले आहे.
किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची
हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणी करण्यासाठी ग्रेपनेट,
मॅगोनेट, अनारेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसीत केल्या आहेत. याअंतर्गत
शेतकऱ्यांना नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्या सुधारित मानंक
पध्दतीमधील ॲनेक्झर-1 नुसार शेतकऱ्यांनी ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी
तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे विहीत प्रपत्रात अर्ज सादर करतात.
यावर्षी राज्यात
निर्यासीत चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा
लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे. निर्यातक्षम
बागांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी ॲड्राईड मोबाईल ॲपमध्ये गुगल प्ले स्टोअरव्दारे
अपेडाने विकसीत केलेल्या फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी http://play.google.com/store/apps/details?id=in.gov.apeda.apedaapp
या लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये
देण्यात आलेल्या माहितीत स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ई-मेल
आयडी ही माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज
करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होत आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.