** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 6, 2020

विधान परिषद निवडणूक २०२० पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी शनिवारीही अर्ज स्वीकारणार

 


 

            कोल्हापूर, दि. ६ (जिल्हा माहिती कार्यालय)- उद्या शनिवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी असली तरी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

      भारत निवडणूक आयोगाच्या  आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

            त्या अनुषंगाने उद्या शनिवारी दि. ७ नोव्हेंबर, रोजी शासकीय सुट्टी असली तरी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत.

 0 0  0 0 0  0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.