** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 9, 2020

जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र नाही; पदवीधरसाठी साताऱ्यातून दोन

 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दाखल झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत आहे. आजअखेर पदवीधर मतदार संघासाठी साताऱ्यातून दाखल झालेली दोन नामनिर्देशन पत्रे वगळता आजअखेर पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघासाठी जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.