** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, November 21, 2020

आजअखेर 46 हजार 637 जणांना डिस्चार्ज

 


 

 कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 800 प्राप्त अहवालापैकी 763 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 14 आहेत (6 अहवाल पुन्हा तपासणी, 17 अहवाल नाकारण्यात आले). ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 129 प्राप्त अहवालापैकी 128 निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह  आहेत. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 152 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 132 तर 20 पॉझीटिव्ह, असे एकूण 35 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 48 हजार 895 पॉझीटिव्हपैकी 46 हजार 637 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 587 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 35 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-5, चंदगड-3, कागल-1, करवीर-1, पन्हाळा-1, नगरपरिषद क्षेत्र-4, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16, व इतर शहरे व राज्य 4 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-856, भुदरगड- 1227, चंदगड- 1209, गडहिंग्लज- 1457, गगनबावडा- 144, हातकणंगले-5276, कागल-1661, करवीर-5604, पन्हाळा- 1848, राधानगरी-1233, शाहूवाडी-1343, शिरोळ- 2491, नगरपरिषद क्षेत्र-7404, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 855 असे एकूण 46 हजार 608 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 287 असे मिळून एकूण 48 हजार 895 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 48 हजार 895 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 46 हजार 637 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 671 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 587 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.