कोल्हापूर दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सोमवार
दि. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार विषयक कर्ज योजना या विषयावर अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. संजय पवार यांचे ऑनलाईन
मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले असून जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या सत्राचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.