** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 2, 2020

नॉन कोव्हिड रूग्णांसाठी सीपीआर रूग्णालय सुरू करा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सूचना

 


 

कोल्हापूर दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) :- सीपीआर रूग्णालय नॉन कोव्हिड रूग्णांसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या.

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज प्रभारी अधीष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून या सूचना दिल्या. सीपीआर नॉन कोव्हिड रूग्णांसाठी सुरू करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोव्हिड रूग्णांसाठी वापरलेले वॉर्डचे निर्जंतुकीकरण करून मगच नॉन कोव्हिड रूग्णांवर या ठिकाणी उपचार करावेत,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.