** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 20, 2020

पणजी येथे 46 वी डाक अदालत

 


कोल्हापूर, दि. 20  (जिल्हा माहिती कार्यालय): पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी व्दारे दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा.पोस्ट मास्तर जनरल,गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 46 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

       गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक के. बालाराजू आणि सचिव, डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 4 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.