** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 6, 2020

आजअखेर 46 हजार 14 जणांना डिस्चार्ज

 


 

 कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 465 प्राप्त अहवालापैकी 420 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 22 आहेत. ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 57 प्राप्त अहवालापैकी 56 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 143 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 132 तर 11 पॉझीटिव्ह  असे एकूण 35 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 48 हजार 408 पॉझीटिव्हपैकी 46 हजार 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 740 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 35 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-3, गडहिंग्लज-7, गगनबावडा-1 कागल-1, करवीर-3 राधानगरी-1, शाहूवाडी-1, नगरपरिषद क्षेत्र-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 12 व इतर शहरे व राज्य 3 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-847, भुदरगड- 1211, चंदगड- 1187, गडहिंग्लज- 1423, गगनबावडा- 144, हातकणंगले-5248, कागल-1649, करवीर-5557, पन्हाळा- 1838, राधानगरी-1217, शाहूवाडी-1327, शिरोळ- 2473, नगरपरिषद क्षेत्र-7367, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 672 असे एकूण 46 हजार 160 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 248 असे मिळून एकूण 48 हजार 408 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 48 हजार 408 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 46 हजार 14 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 654 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात 740 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.